केरळ संघाचा पी. टी. एम संघावर 4/0 गोलनी विजय : शाहू महाराज गोल्ङ कप अखिल भारतीय फुटबाॅल स्पर्धा

कोल्हापूरः अनिल पाटील
शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेत के एस इ बी केरला संघानं पाटाकडील तालीम मंडळावर 4.0 गोलनी एकतर्फी विजय प्राप्त करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. केरला संघाच्या करुण बेबीनं पूर्वार्धात तर विक्नेश एम नं उत्तरार्धात तीन गोल नोंदवत हॅक्ट्रीक केली. सामना पाहण्यासाठी फुटबॉल प्रेमींनी गदीँ केली होती.
श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त राजर्षी शाहू गोल्ड कप स्पर्धा सुरु आहे. कोल्हापूर स्पोर्टस असोसिएशनं या स्पर्धेचं आयोजन केले आहे. कोल्हापूरचा पाटाकडील तालीम मंडळ विरुध्द केएसईबी केरला यांच्यात सामना खेळला गेला. पाटाकडील तालीम मंडळाचा ओंकार मोरे, सोमाडी, रोहित देसाई साैरभ साळोखे, ऋषिकेश मेथे – पाटील यांनी केलेल्या चढाया संघाच्या दृष्टीनं फारशा काही कामी आल्या नाही. केरला संघानं मात्र पाटाकडच्या खेळाडूंना रोखण्यात यश मिळवलं. शाॉर्ट पासच्या बळावर पाटाकडील संघाला गोल क्षेत्रात खेळतं ठेवलं. पाटाकडच्या सिमेडोनं केरलाच्या गोल जाळीत मारलेला जोरदार फटका केरलाच्या गोलीनं अचून पणे रोखला. तर ऋषिकेश मेथे – पाटील याला चालून आलेल्या गोलच्या दोन सोप्या संध्या वाया गेल्या. सामन्याच्या ४२ व्या मिनिटाला शार्ट पासच्या जोरावर केरलाच्या करुण बेबी यानं हलकासा मैदानी गोल करुण १ -० अशी आधाडी मिळवत पाटाकडील तालीम संघासमोर आव्हान उभा केलं. मध्यंतरापर्यंत हा सामन्यावर केरलाचं वर्चस्व राहिलं. उत्तरर्धात गोलची बरोबरी साध्यासाठी पाटाकडून खोलवर चढाया झाल्या. पाटाकडच्या ओंकार मोरेनं केरलाच्या छोट्या डी मध्ये दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे – पाटीलनं मारलेला चेंडू गोल पोस्टवरुण गेल्यानं पाटाकडची गोलची सोपी संधी वाया गेली. त्या पाठोपाठ पुन्हा सौरभ सालपे दिलेल्या पासवर ऋषिकेश मेथे – पाटीलनं गोलची दुसरी सोपी संधी गमावल्यानं प्रेक्षकांमधून नाराजीचा सूर उमटला. शांत आणि संयम खेळ करत केरलाच्या करुण बेबीनं दिलेल्या अचूक पासवर पासावर विक्नेश एमनं ४८ व्या मिनिटालाच संघासाठी दुसरा गोल करुण २ -० अशी अधाडी घेतली. केरलाच्या या गोलची बरोबरी साधण्यासाठी सिमेडो, रोहित देसाई यांनी शर्थीचे प्रयत्न केलं. सामन्याच्या ६४ आणि ६८ व्या मिनिटाला विक्नेश एम नं गोल करुण ४ -० अशी भक्कम आघाडीच्या बळावर केरला संघानं हा सामना जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला. या सामन्यात केरलाच्या विक्नेश एम नं गोलची हॅट्रीक साधली. या सामन्यातील विजयी केरला संघाच्या प्रशिक्षकांनी आमच्या पेक्षा पीटीएम संघ सरचं असल्याचं सांगितलं.पी. बी. रमेश ( प्रशिक्षक – केएसईबी केरला)
अनपेक्षित झालेले पहिले दोन गोल संघाला मारक ठरल्याचं पीटीएमच्या प्रशिक्षकांनी सांगितलं.
शरद माळी (प्रशिक्षक पीटीएम)
या सामन्यात केरलानं शार्ट पासचा अधिक वापर केला. दोन्ही संघांना गोलची चांगली संधी चालून आली त्यामध्ये केरलानं ४ गोल नोंदवल्या या उलट पीटीएमला गोलची चालून आल्या सोप्या संध्या गमावल्या.
अभिजित वणिरे (समिक्षक) उद्या – संयुक्त जुना बुधवारपेठ विरुध्द रुटस फुटबाॉल क्लब बंगळूर यांच्या सामना खेळवला जाणार.