क्राईममहाराष्ट्र

वाशी पोलिसांची धडक कारवाई; पृथ्वीराज हॉटेल-लॉजवर छापा दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका, हॉटेल मालकासह ग्राहक जेरबंद

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने) :- 

धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात देहविक्री व्यवसायावर वाशी पोलिसांनी मोठी कारवाई करत पारगाव येथील पृथ्वीराज हॉटेल व लॉजवर छापा टाकून दोन पीडित मुलींची सुखरूप सुटका केली आहे. या कारवाईत हॉटेल मालकासह संबंधित ग्राहकांना ताब्यात घेण्यात आले असून, अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलीस स्टेशन वाशी हद्दीत देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर वाशी पोलिसांनी तात्काळ नियोजनबद्ध छापा टाकला. दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 8.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. छाप्यादरम्यान हॉटेल-लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर तात्काळ दोन पीडित मुलींना मुक्त करण्यात आले.
ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक, धाराशिव श्रीमती रितु खोखर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.
पोलीस निरीक्षक शंकर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अजयसिंह भाळे, अंमलदार बळीराम यादव, विठ्ठल मलंगनेर, नसीर सय्यद, गोपीनाथ पवार, शिवा कोरडे तसेच महिला पोलीस अंमलदार श्रीमती ज्योती बहीरवाल यांच्या पथकाने ही कारवाई केली.
सुटका करण्यात आलेल्या पीडित मुलींची तात्काळ वैद्यकीय तपासणी करून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तसेच त्यांचे समुपदेशन व पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे देहविक्रीसारख्या अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांनी घेतलेल्या ठोस भूमिकेचे कौतुक नागरिकांकडून होत असून, भविष्यातही अशा कारवाया सातत्याने राबवाव्यात, अशी मागणी करण्यात येत आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!