भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांच्या वतीने निशिदी ज्येष्ठ नागरिक संघ येथे माझी मराठी समृद्ध मराठी कार्यक्रम साजरा

दर्पण न्यूज भिलवडी:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी सार्वजनिक वाचनालय भिलवडी यांचे वतीने मराठी भाषा समृद्धी पंधरवडा निमित्ताने आज दिनांक 22 जानेवारी 2026 रोजी निशिदी जेष्ठ नागरिक संघ येथे माझी मराठी समृद्ध मराठी हा विशेष कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त न्यायमूर्ती जगन्नाथ माळी साहेब होते प्रारंभी वाचनालयाचे कार्यवाहक सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून मराठीच्या समृद्ध परंपरेचा विस्ताराने आढावा घेतला यावेळी डी आर कदम सर जयंत केळकर यांनी वाचन संस्कार याविषयी मनोगत व्यक्त केले रमेश चोपडे सर यांनी त्यांच्या स्वलिखित कवितांचे बहारदार सादरीकरण केले.अध्यक्ष न्यायमूर्ती जगन्नाथ माळी साहेब यांनी मराठीच्या बोलीभाषांचे संरक्षण करण्याची गरज प्रतिपादन करून सर्वांनी मराठीचा आग्रह धरावा असे आवाहन केले यावेळी निशिदी जेष्ठ नागरिक संघटनेचे पदाधिकारी सभासद वाचनालयाचे अजीव सभासद उत्तम मोकाशी सर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.यावेळी कार्यवाह सुभाष कवडे यांनी पुस्तक भेट संकल्प वर्ष ग्रंथालय आपल्या दारी महिला वाचक मेळावा या वाचनालयाच्या उपक्रमांची विस्ताराने माहिती देऊन यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन केले डी आर कदम सर यांनी शेवटी आभार मानले या अभिनव उपक्रमाचे सर्व जेष्ठ नागरिकांनी कौतुक केले.



