ताज्या घडामोडी
…अखेर भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसची प्रतिक पाटील यांना तिकीट

दर्पण न्यूज भिलवडी – ; भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाची तिकीट प्रतीक पाटील यांनाच मिळाली. त्यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विवेक काळे यांच्याकडे दाखल केला.
प्रतीक पाटील हे दिवंगत काँग्रेस नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य स्व. संग्राम पाटील यांचे सुपुत्र असून, त्यांच्या उमेदवारीमुळे भिलवडी गटात तरुण नेतृत्वाला संधी मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. वडिलांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवलेल्या विविध विकासकामांचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार प्रतीक पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना व्यक्त केला.
प्रतीक पाटील यांना भिलवडी गटात मोठी सहानुभूती तसेच कार्यकर्त्यांचे भक्कम पाठबळ मिळत असल्याचे दिसून येत आहे.


