डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय हँडबॉल स्पर्धेमध्ये पटकावले उपविजेतेपद

दर्पण न्यूज पलूस:- वाघोली येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय हँडबॉल स्पर्धेमध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) उपविजेतेपद पटकावले.
विजयी संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून सांघिक विजेतेपद पटकावले.
विजयी संघाचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. यु. व्ही.पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट असा खेळ करून अजिंक्यपद पटकावले.
रामानंद नगर कॉलेज आणि हँडबॉल एक जिव्हाळ्याचा संबंध कायमचा राहिलेला आहे. यामुळे येथील प्रत्येक विद्यार्थी आजी-माजी हँडबॉल ची जोडलेला आहे. बऱ्याच वर्षानंतर अशी कामगिरी झाल्यामुळे रामानंदनगर कॉलेज परिसरात आजी-माजी विद्यार्थ्यांकडून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
संघाला लेफ्टनंट संदेश दौंडे, योगेश पाटील, मार्गदर्शक उदय भोरे, वैभव उगळे, तौफिक कोकणे व माजी विद्यार्थी यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघ पुढीलप्रमाणे
यश साठे,आयन मुल्ला, आदित्यराज कुंभार, निवास उगळे, पार्थ शिंदे, सत्यजित वडर, शशिकांत जाधव, सुभान मुलानी, प्रकाश भोसले, तेजस यादव ओंकार नेरलेकर



