इच्छुक उमेदवार डिकसळ जिल्हा परिषद गट : लता बौद्धराज रणदिवे उच्चशिक्षीत, अनुभवी व्यक्तीमत्व

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी
(संतोष खुने ) :-
कळंब तालुक्यातील आता होऊ घातलेल्या पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत उमेदवार हा नामधारी नसावा.जनतेचे प्रश्न मांडणारा सुशिक्षित असावा.1) उमेदवार हा शेठ, साहेब, भाऊ, ताई, भाई यांचा जवळचा नसून जनतेचे प्रश्न मांडणारा किंवा त्यांच्या अडचणी समजणारा पाहिजे.
2) प्रशासकीय अधिकारी हा त्या विभागातील त्याला कामाची माहिती असते. पण कार्यकर्ता किंवा उमेदवाराला संबंधित सर्व विभागाबाबत माहिती असणारा पाहिजे. उदा. महावितरण,कृषी, तहसील, वन विभाग, बँक, पोस्ट ऑफिस, पंचायत समिती विभागातील सर्व कार्यालयांची माहिती, त्यांच्या योजना बाबत माहिती, विविध योजनाची माहिती, पोलिस स्टेशनला बाबत माहिती, हॉस्पिटल बाबत माहिती असणे गरजेच आहे.
3)उमेदवार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांतून चालणारा म्हणजेच आठरा पगड जाती , व बारा बलुतेदार, शेतकरी, यांना सोबत घेऊन जाणारा असावा. संविधानाच्या, लोकशाहीच्या मार्गाने जाणारा असावा*



