डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर यांनी शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल (महिला) स्पर्धेमध्ये अजिंक्यपद पटकावले

दर्पण न्यूज पलूस:- मिरज येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ अंतर विभागीय बेसबॉल (महिला) स्पर्धेमध्ये डॉ. पतंगराव कदम महाविद्यालय, रामानंदनगर (बुर्ली) विजेतेपद पटकावले.
विजयी संघातील सर्वच खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ करून सांघिक विजेतेपद पटकावले.
विजय संघाचे महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. यु. व्ही.पाटील यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट असा खेळ करून अजिंक्यपद पटकावले. रामानंदनगर कॉलेज परिसरात आजी-माजी विद्यार्थ्यांकडून खेळाडूंचे अभिनंदन होत आहे.
मृणाली जाधव हिने भेदक अशी पिचिंग केली, अंजली पवार, साक्षी येताळे यांनी उत्कृष्ट बॅटिंग केली. संघाला लेफ्टनंट संदेश दौंडे, संतोष साळुंखे, अभय बिराज यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी संघ पुढीलप्रमाणे
अंजली पवार, साक्षी येताळे, मृणाली जाधव, वैष्णवी पवार, श्रद्धा जाधव, सानिका दमामे, प्रियांका सावंत, आलिया मुलानी, मधुरा मदने, श्रुतिका पाटोळे, अमृता साळुंखे, रिया सावंत.



