क्राईम
ठिकपूर्लीत सर्पदंश झाल्याने शेतकरी जखमी

कोल्हापूरः अनिल पाटील
शेतात किटकनाशकाची फवारणी करताना सर्पदंश झाल्याने संदीप बळवंत पाटील ( वय 41) हा शेतकरी जखमी झाला
आज सकाळी 11 वाजण्याच्या सूमारास तो आंबूशेत नावाच्या शेतात किटकनाशकाची फवारणी करत होता. फवारणी झाल्यानंतर तो पाणी पिण्यासाठी एका झाङाखाली बसला होता.यावेळी त्याला सर्पदंश झाला. त्याच्यावर सी.पी. आर .रूग्णालयात उपचार सूरू आहेत.