पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या प्रचारास खंडोबाची वाडी, माळवाडी येथे उत्स्फूर्त प्रतिसाद

भिलवडी :- पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार डॉ विश्वजीत कदम यांच्या खंडोबाची वाडी, माळवाडी येथील प्रचाराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामस्थ, महिला-भगिनी व कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
यावेळी डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, या भागातील लोकांनी आम्हाला सहकार्य केले आहे. गेल्या सहा वर्षांत मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी आणून गावोगावी विकासाची कामे केली आहेत. मतदारसंघातील जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देत जनतेच्या जीवनात आर्थिक सुबत्ता आणण्याचे काम आपण केले. . आपल्या मतदारसंघाला व महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आणणे अत्यंत गरजेचे आहे.त्यासाठी येत्या २० नोव्हेंबरला ‘हाताचा पंजा’ या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करा, असे आवाहन डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
या प्रचाराला काँग्रेस पक्षाचे युवा नेते सतीश आबा पाटील, अभिजीत कोळी यांनी मनोगत व्यक्त केले.
या प्रचाराला माळवाडी, खंडोबाचीवाडी येथील विविध क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्ते महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.