महाराष्ट्र
भिलवडी येथील माजी सरपंच निजाम ढालाईत यांचे निधन

भिलवडी : सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील माजी सरपंच
निजाम कबीर ढालाईत ( 99) यांचे निधन झाले आहे.
ते काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते होते. स्व.वसंतदादा पाटील,डॉ.पतंगराव कदम,आर.आर.पाटील यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
रक्षा विसर्जन सोमवार दिनांक 7 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजता भिलवडी येथे आहे.