महाराष्ट्रराजकीय
भिलवडी येथे आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या आदेशाचे पालन ; काँग्रेस उमेदवारांकडून प्रचार ; ज्येष्ठ नेते, युवक सक्रिय


दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस :- नुकत्याच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत इच्छुक उमेदवारांनीही जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. मात्र, हायकमांड माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केलेल्या आदेशानुसार जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिक पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली. त्यानुसार आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या आदेशाचे पालन करीत भिलवडी येथील काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते युवक सक्रिय सहभाग घेऊन प्रचार करीत आहेत.
भिलवडी जिल्हा परिषद गटातून काँग्रेसकडून प्रतिक पाटील, पंचायत समिती कडून सलामते, पुजारी यांची उमेदवारी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी जाहीर केल्यानंतर उमेदवारांनी लोकतिर्थ येथे स्व डॉ पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचे पूजन केले. त्यानंतर युवकांनी मोर्चेबांधणी सुरू करून प्रचार सुरू केला.



