श्रीराज ओंकार,अनिकेत,आदित्य व रवींद्र आघाडीवर : मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक खुल्या बुद्धीबळ स्पर्धा

कोल्हापूर ःअनिल पाटील
– ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम आयोजित मंगेशराव कुलकर्णी स्मृती पायोनियर चषक खुल्या जलद बुद्धिबळ स्पर्धा आज उत्साहात प्रारंभ झाल्या.मुंबई,पुणे,सातारा,सांगली, सोलापूर,बेळगाव,निपाणी, चिकोङी व स्थानिक,जयसिंगपूर,इचलकरंजी, कोल्हापूर येथील नामवंत 158 बुद्धिबळपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.यापैकी 60 बुद्धिबळपटू आंतरराष्ट्रीय गुणांकन प्राप्त आहेत.
![]()
पायोनियर एनर्जी व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर यांनी प्रायोजित केलेल्या या स्पर्धा स्विस् लीग पद्धतीने एकूण नऊ फेऱ्यात होणार आहेत.स्पर्धेचे उद्घाटन पायोनियर एनर्जीचे महेश कुलकर्णी व सोलापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष प्रा.अरुण मराठे यांच्या हस्ते बुद्धिबळाच्या पटावर चाल करून करण्यात आले यावेळी रोटरी क्लबचे कोल्हापूरचे डॉ.अभिजीत हावळ, ब्राह्मण सभा मंगलधाम चे सचिव श्रीकांत लिमये, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले, पायोनियर चे नितीन कुलकर्णी, रोटरी क्लबचे धीरज बटेजा व शिवप्रसाद कुलकर्णी, मंगलधामचे रामचंद्र टोपकर,बुद्धिबळ संघटनेचे मनीष मारुलकर, धीरज वैद्य, उत्कर्ष लोमटे व सूर्याजी भोसले व्यासपीठावर उपस्थित होते.
आज झालेल्या तिसऱ्या फेरीनंतर अग्रमानांकित रेंदाळचा श्रीराज भोसले, तृतीय मानांकित मुंबईचा ओंकार कडव, चौथा मानांकित सातारचा अनिकेत बापट, पाचवा मानांकित कोल्हापूरचा आदित्य सावळकर, सातवा मानांकित इचलकरंजीचा रवींद्र निकम,आठवा मानांकित कोल्हापूरचा प्रणव पाटील, नववा मानांकित मिरजेचा अभिषेक पाटील, दहावा मानांकित कोल्हापूरचा सोहम खासबारदार अकरावा मानांकित कोल्हापूरचा श्रीधर तावडे, तेरावे मानांकित कोल्हापूरचे माधव देवस्थळी, पंधरावे मानांकित कोल्हापूरची बी.एस.नाईक, सोळावा मानांकित कोल्हापूरचा सारंग पाटील, सतरावा मानांकित कोल्हापूरचा आदित्य आळतेकर, अठरावा मानांकित इस्लामपूरचा संतोष सरीकर , तेवीसावी मानांकित कोल्हापूरची तृप्ती प्रभूू व चौतीसावा मानांकित सोलापूरचा स्वप्निल हदगल हे सतरा जण तीन गुणांसह संयुक्तपणे आघाडीवर आहेत.द्वितीय मानांकित मिरजेच्या मुद्दसर पटेल सह,नारायण पाटील कोल्हापूर,हर्षवर्धन शिंदे सातारा व वेदांत दिवाण कोल्हापूर हे चौघेजण अडीच गुणासह संयुक्तपणे द्वितीय स्थानावर आहेत.




