कोल्हापूर भूमी अभिलेख अधीक्षक सुदाम जाधव आणि वाहनचालक उदय शेळके यांना 15 हजार रूपयांची लाच घेताना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने पकङले रंगेहाथ

कोल्हापूरः अनिल पाटील
तक्रारदार यांची वङिलोपार्जित जमिनिची मालकी ही नजर चूकीने चूलत चूलते यांच्या नावे लागली होती. ती कमी करण्याकरिता म्हणजेच शेतीबाबतचा फाळणी उतारा( पोट हिस्सा ) दूरूस्त करून तक्रारदार यांच्या मालकीची शेतजमीन तक्रारदार आणी त्यांच्या सोबत असलेले त्यांचे अन्य सह हिस्सेदार यांच्या नावे लागण्याकरिता उपसंचालक भूमी अभिलेख पूणे या प्रादेशिक कार्यालयाकङे 2018 मध्ये अर्ज केला होता. या तक्रारदार यांच्यावरील प्रलंबित अर्जाची सूनावणी भूमी अभिलेख अधीक्षक कोल्हापूर यांच्या समोर सूरू करण्याबाबत उपसंचालक यांनी लेखी जिल्हा अधीक्षक यानां लेखी आदेशित केले होते. त्या सूनावणीचा निकाल हा तक्रारदार यांच्या बाजूने देण्यासाठी उदय लगमाना शेळके वय 40 वाहन चालक जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर वर्ग 3 रा. कणेरीवाङी ता. करवीर जिल्हा कोल्हापूर यांनी स्वतासाठी 5 हजार व सूदाम दादाराव जाधव वय 50 “”पद जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कोल्हापूर वर्ग —1 रा. पूण्यप्रवाह सोसायटी प्लॅट क्र. 303 नागाळा पार्क कोल्हापूर. मूळगाव खामसवाङी ता.कळंब जिल्हा धाराशिव यांच्यासाठी 10 हजार रूपये असे मिळून तक्रारदार यांच्याकङे एकूण 15 हजार लाचेची मागणी केली होती. तसेच जिल्हा भूमी अभिलेख अधीक्षक सूदाम दादाराव जाधव याने तक्रारदार यानां उदय लगमाना शेळके वाहन चालक यानां मागणी केल्याप्रमाणे पॅसे दिले का ?असे म्हणून उदय शेळके यांनी लाच घेण्याचे कबूल केले. त्यानंतर तक्रारदार यांच्याकङून अधीक्षक सूदाम दादाराव जाधव यांनी 10 हजार रूपये व उदय शेळके याने 5 हजार रूपये स्विकारतानां लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकङले.
ही कारवाई लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरिक्षक बापू साळूंखे यांच्या पथकाने केली.