जयसिंगपूर येथे धम्म महापरिषदेदिनी उद्योगपती सी.आर. सांगलीकर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे दिमाखात अनावरण

जयसिंगपूर : कोल्हापूर जिल्हा जयसिंगपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बौध्द संस्कार मंडळाच्यावतीने ३३वी अखिल भारतीय बौद्ध धम्म महापरिषद झाली. धम्म परिषदेत दिल्ली येथील सर्वोच्च न्यायालय आवारात उभारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणे पहिली हुबेहूब प्रतिकृती असलेल्या पुतळ्याचे अनावरण धम्मभूमी गुगवाडचे निर्माते, उद्योगपती सी.आर.सांगलीकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.
तत्पूर्वी मा.सांगलीकर साहेब यांनी धम्म परिषदेतील पुस्तक स्टाॅलना आवर्जून भेट दिली. नवनवीन लेखकांची अभ्यासपूर्ण आणि दर्जेदार पुस्तके मिळतात, हे पाहून आनंद व्यक्त केला. अनेक पुस्तकांची खरेदी केली. महापरिषदेचे उद्घाटन पूज्य भदंत प्रा.डॉ.एम.सत्यपाल महास्थविर (छत्रपती संभाजीनगर) यांच्या हस्ते झाले.अध्यक्षपदी पूज्य भदंत प्रा. डॉ.यशकाश्यपायन महास्थविर होते.
मूर्तीकार कैलास अलासकर यांनी अत्यंत सुंदर आणि सुबक अशी डॉ. बाबासाहेब यांचा पुतळा बनवला आहे.
पूज्य भिक्खुनी बुद्धकन्याजी थेरी, पूज्य भदंत आर.आनंद स्थविर, पूज्य भदंत संबोधी,पूज्य भदंत धम्मधर स्थविर हा भिक्खु संघ प्रामुख्याने उपस्थित होते. या धम्म महापरिषदेचे अत्यंत नेटके नियोजन केले होते. या धम्म महापरिषदेला हजारोंच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.