क्राईममहाराष्ट्रराजकीय

कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्र चोराखळी येथे डोक्याला पिस्तूल लावून साडेनऊ लाख दरोडा ; दोन आरोपी तेरखेडाचे

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-

डोक्याला पिस्तूल लावून साडेनऊ लाख दरोडा टाकला कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्र चोराखळी
दोन आरोपी तेरखेडा गावचे आहेत.
येरमाळा पोलीस ठाणे :दि.02.03.2026 रोजी 05.30 वा. स. धाराशिव साखर कारखान्याजवळएनएच 52 रोडवरीलब्रिजच्या बाजूलाकालिका नावाचे सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्र चोराखळी शिवार येथे आरोपी नामे- सचिन उर्फ प्रंशात बापु पवार, रा. लक्ष्मी पारधी पिडी तेरखेडा, महादेव घुले, रा. तेरखेडा सोबत इतर 5 अज्ञात व्यक्ती यांनी फिर्यादी नामे-निर्मला मोहनजाधव, वय 45 वर्षे, व्यवसाय सांस्कृतिक कलाकेंद्र चालक रा. चोराखळी ता. कळंब जि. धाराशिव व साक्षीदार यांचे डोक्याला पिस्टल व गळ्याला लोखंडी सुरा लावुन जिवे मारण्याची धमकी देवून तसेच डोळ्यात चटणी टाकुन सोन्याचे 121.600ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 4 मोबाईल फोन व सीसीटीव्ही डिव्हीआर असा एकुण 9,51,000₹ किंमतीचा माल दरोडा टाकुन चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-निर्मला जाधव यांनी दि.02.03.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 310(2),118(1), 333, 351(2)(3), सह कलम 3/25, 4/25 शस्त्र अधिनियम अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!