महाराष्ट्रसामाजिक

माजी सहकार मंत्री कै पतंगराव कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अस्मिता कदम जगताप यांची भावनिक पोस्ट

दर्पण न्यूज पलूस/भिलवडी :-

माजी सहकार मंत्री कै पतंगराव कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त अस्मिता कदम जगताप यांनी अतिशय भावनिक पोस्ट फेसबुक वर शेअर केली आहे.

तुमच्या विचारांचा वसा घेऊनच माझा प्रवास आजही पुढे चालू आहे. आयुष्याकडे कसं पाहायचं, माणसांशी कसं वागायचं, आणि कोणत्याही परिस्थितीत स्वतःची मूल्यं कशी जपायची — हे सगळं मला तुमच्याकडूनच शिकायला मिळालं.

आजही आयुष्यात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असेल, किंवा एखादा क्षण मनाला स्पर्श करून जात असेल, तेव्हा नकळत तुमची आठवण येते. मनात एकच विचार येतो — तुम्ही असता तर काय सांगितलं असतं? आणि त्या आठवणीतच मला दिशा मिळते.

असा एकही दिवस जात नाही ज्या दिवशी तुमची आठवण येत नाही. तुमचं मार्गदर्शन, तुमचा विश्वास आणि तुम्ही दिलेले संस्कार — हेच आज माझ्या प्रत्येक पावलामागचं खरं बळ आहे.

काळ पुढे सरकतो, आयुष्य बदलतं… पण काही नाती, काही शिकवण आणि काही आठवणी आयुष्यभर आपल्यासोबत राहतात.

तुम्ही दिलेली मूल्यं आणि तुमचा आशीर्वाद — हाच माझ्यासाठी कायमचा दीपस्तंभ आहे.

– तुमची अस्मिता 🤍

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!