क्राईममहाराष्ट्र

पाथर्डी येथे पोल्ट्री फार्म मध्ये विषारी औषध टाकल्याने 160 कोंबड्यांचा मृत्यू

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे):-

पाथर्डी येथे पोल्ट्री फार्म मध्ये विषारी औषध टाकल्याने 160 कोंबड्यांचा मृत्यू झाला आहे.
कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- गणेश अरुण आडसुळ, वय 36 वर्षे, रा. ईटकुर ता. कळंब जि. धाराशिव यांचे पाथर्डी ईटकुर रोडवर शेत गट नं 703 मधील माउली ॲग्रो फॉर्म वरील कोंबड्यांना अज्ञात व्यक्तीने .26.02.2026 रोजी 10.00 ते 15.00 वा. सु. विषारी औषध टाकल्याने 160 कोंबड्या मरण पावून अंदाजे 48,000₹चे नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गणेश आडसुळ यांनी दि.27.02.2026 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन पो ठाणे कळंब येथे भा.न्या.सं.कलम 325 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!