भिलवडी येथील “त्या” चोऱ्यांचा छडा ; सराईत चोरटा गजाआड ; भिलवडी पोलिस ठाण्याची दमदार कामगिरी
चोरटा एकटा असल्याने मोठ्या हुशारीने पोलिसांनी पकडला ; भिलवडी स्टेशन ते पाचवा मैल जाणारे उड्डाण पुलाचे खाली संशयीतरित्या थांबला होता चोरटा


दर्पण न्यूज पलूस भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथे काही दिवसांपूर्वी दुकाने फोडून चोरटा फरार होता. मात्र भिलवडी पोलिस ठाण्याच्या दमदार कामगिरीमुळे घरफोडी करणारा चोरटा गजाआड करण्यात आला आहे एकुण २ चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आला आहे.
दिनांक ०२.०३.२०२६
पोलीस ठाणे
अपराध क्रमांक व कलम
फिर्यादी नांव
भिलवडी पोलीस ठाणे
गुरनं १७/२०२६ भारतीय न्याय संहीता २०२३ चे कलम ३०५ (अ), ३३४(१) प्रमाणे
नारायण मनोहर पाटील वय ४० वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. कवठेएकंद, ता. तासगाव, जि. सांगली
गुन्हा घडला ता. वेळ. ठिकाण
गुन्हा दाखल
माहीती प्राप्त
दिनांक १३.०२.२०२६ रोजी २०.१५ वा ते दिनांक १४.०२.२०२६ रोजी ०९.०० वा दरम्यान
दिनांक १४.०२.२०२६ रोजी १६.४५ वा
सपोनि भगवान पालवे यांना गोपनिय बातमीदारामार्फत
कारवाई करणारे अधिकारी व अंमलदार
मा. पोलीस अधीक्षक साो संदीप घुगे मा. अपर पोलीस अधीक्षक साो कल्पना बारवकर उपविभागीय पोलीस अधिकारी साो सचिन थोरबोले तासगांव विभाग तासगांव यांचे मार्गदर्शनाखाली भगवान पालवे सहा. पोलीस निरीक्षक रोहिदास पावशे पोलीस उप निरीक्षक पोहेकॉ संतोष बेंबडे, महेश घस्ते, सुनिल सुर्यवंशी, राहुल जाधव पोना तोसिफ मुजावर, मपोना सुकन्या भागवत पोशि धिरज खुडे, सतपाल सावंत, रामचंद्र गायकवाड, सुमित खोत, संतोष जाधव ईश्वरपुर पोलीस ठाणेकडील पोशि विशाल पांगे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील पोशि बसवराज कुंदगोळ सायबर पोलीस ठाणेकडील पोशि अजय पाटील, विवेक साळुंखे, अभिजीत पाटील
आरोपीचे नांव :- १) विशाल संभाजी पवार वय २७ वर्ष रा.उमराणी, ता.जत, जि. सांगली
गुन्हयातील जप्त मुद्देमाल
१) १३,५३०/- रूपये किमतीच्या ५००,५०,२०,१० रूपयेच्या चलनी नोटा.
२) ००.००/- रुपये किंमतीचा एक रिंग पाना जु.वा.कि.अ.
उघडकीस आलेले गुन्हे१) भिलवडी पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरनं १७/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३३१(४), ३०५ (अ) प्रमाणे
२) शिरोळ पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरंन ३८५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३३१(३),३३१ (४),३००५ (अ) प्रमाणे
भिलवडी पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरनं १७/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४), ३०५ (अ) प्रमाणे दिनांक १३.०२.२०२६ रोजी २०.१५ वा ते दिनांक १४.०२.२०२६ रोजी ०९.०० वा दरम्यान यातील फिर्यादी नारायण मनोहर पाटील वय ४० वर्षे, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. कवठेएकंद, ता. तासगाव, जि. सांगली हे कामाला असले शिरोटे किराणा स्टोअर्स, तसेच साक्षीदार शांतिनाथ आण्णा शेडबाळकर, रा. भिलवडी ता. पलुस यांचे पारस कृषी सेवा केंद्र रोडचा पाठीमागील पत्रा कशानेतरू उचकटून आत प्रवेश करून दोन्ही दुकानातील एकुण ४१,०४५ रुपयेचा मुद्देमाल लबाडीने चोरून नेलेला आहे म्हणून वगैरे प्रकारे वर्दीदार यांनी दिले वर्दीवरून दिनांक १४.०२.२०२६ रोजी १६.४५ वा भिलवडी पोलीस ठाणे येथे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल आहे.
दिनांक २८.०२.२०२६ रोजी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांना गोपनिय बातमीदारांमार्फत माहीती मिळाली की, भिलवडी स्टेशन ते पाचवा मैल जाणारे उड्डाण पुलाचे खाली एक इसम संशयीतरित्या थांबला आहे, अशी खात्रीशीर बातमी मिळालेने सपोनि भगवान पालवे यांनी भिलवडी पोलीस ठाणेकडील पोहेकों/सुनिल सुर्यवंशी, महेश घस्ते, पोशि/धिरज खुडे, संतोष जाधव यांना सदर बातमीची पडताळणी करणेकरिता तात्काळ रवाना केले. भिलवडी पोलीस ठाणेकडील वरील पथकाने भिलवडी स्टेशन ते पाचवा मैल जाणारे उड्डाण पुलाजवळ जाऊन पाहिले असता, एक इसम खांद्यावर बॅग घेवून संशयीतरित्या थांबला असलेचे दिसले. त्यावेळी वाहन त्याचेपासून थोडे अंतरावरती लावुन पायी चालत जावुन त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव विशाल संभाजी पवार वय २७ वर्ष रा.उमराणी, ता.जत, जि. सांगली असे सांगितले. त्यानंतर त्याला तेथे उभा असलेचे कारण विचारले असता त्याने काहीएक समाधानकारक माहीती दिली नाही व त्याचेजवळ असले बॅगमध्ये काय साहित्य आहे अशी विचारणा करित असता तो उडवाउडवीची उत्तरे देवू लागला. त्यावेळी त्याचेवर अधिक संशय आलेने पोलीसांनी लागलीच त्याचे जवळ असले बॅगची झडती घेतली असता, त्याचे बॅगमध्ये ५००,५०,२०,१० रूपयेच्या चलनी नोटा असलेचे आढळून आल्या. त्या खालीलप्रमाणे
१) १३,५३०/- रूपये किमतीच्या ५००,५०,२०,१० रूपयेच्या चलनी नोटा.
२) ००.००/- रुपये किंमतीचा एक रिंग पाना जु.वा.कि.अ.
येणेप्रमाणे वरील वर्णनाच्या मुद्देमालाबाबत त्याचेकडे विश्वासात घेवुन खात्री केली असता, त्याने सदरच्या नोटा भिलवडी पोलीस ठाणे हद्दीमधील भिलवडी गावातील सेकंडरी हायस्कुल ते ग्रीन पार्क हॉटेल दरम्यान असले पारस कृषी सेवा केंद्र व शिरोटे किराणा स्टोअर्स दुकानांचे शेडचा पत्रा उचकटून चोरी केली असलेबाबत सांगितले. त्याबाबत भिलवडी पोलीस ठाणे येथे भिलवडी पोलीस ठाणे सीसीटीएनएस गुरंन १७/२०२६ भारतीय न्याय संहीता कलम ३३१ (४),३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार सुनिल सुर्यवंशी हे करित आहेत. त्याचेकडे अजुन चौकशी केली असता त्याने दिनांक ०२.१२.२०२५ रोजी २१.०० वा ते दिनांक ०३.१२.२०२५ रोजी सकाळी ०९.३० वाचे दरम्यान शिरोळ पोलीस ठाणे जि. कोल्हापुर हद्दीमधील राणा परमिट रूम व बिअर बारमध्ये चोरी केलेले कबुल केलेले आहे, सदरबाबत शिरोळ पोलीस ठाणे जि. कोल्हापुर गु.र.नं ३८५/२०२५ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५ (ए), ३३१(३), ३३१ (४) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
पुढील तपास भिलवडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान पालवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.



