खटाव येथे माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या विशेष प्रयत्नातून ३ कोटी ८५ लाखांचे भूमिपूजन, उद्घाटन
महेंद्र (आप्पा) लाड यांची उपस्थिती : गावचा विकास करणार; सरपंच ओंकार पाटील

भिलवडी: सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील मौजे खटाव येथे माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या विशेष प्रयत्नातून एकूण ३ कोटी ८५ लाख रक्कमेचे भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाले.
यामध्ये –
१) कामाचे नाव – मौजे खटाव येथील सटवाई रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
रक्कम ३ कोटी ५० लाख
योजनेचे नाव – बजेट
२) कामाचे नाव – खटाव येथील दलित वस्ती स्मशानभूमी ते विजय भिकू कांबळे घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे.
रक्कम १० लाख
योजना – सामाजिक न्याय
३) कामाचे नाव – खटाव येथील तलाठी कार्यालय निवास इमारत बांधणे.
रक्कम १५ लाख
योजना – जिल्हा नियोजन समिती
४) कामाचे नाव – खटाव येथील ग्राम सचिवालय इमारत बांधणे.
रक्कम १० लाख
योजना – जिल्हा नियोजन समितीतसेच गावामध्ये विविध ठिकाणी घरकुल योजनांचे भूमिपूजन आमदार डॉ विश्वजीत कदम हस्ते आणि मा. महेंद्र (आप्पा) लाड संचालक, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी खटावचे सरपंच ओंकार पाटील, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, जेष्ठ व युवक कार्यकर्ते, ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी सरपंच ओंकार पाटील यांनी सांगितले की, खटाव गावच्या विकासासाठी आमच्या सर्व सहकार्याचे प्रयत्न असणार आहेत. गावाच्या विकासासाठी लोकांनाही सहकार्य करावे, असे ही आवाहन सरपंच पाटील यांनी केले.