औदुंबर येथे महाशिवरात्रीनिमित्त १००८ नारळांपासून साकारलेल्या शिवलिंग सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय भिलवडी सेवाकेंद्राचा पुढाकार ; मीरा बहेनजी यांचे मोलाचे मार्गदर्शन





दर्पण न्यूज भिलवडी. :- प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या भिलवडी सेवाकेंद्राच्या वतीने सांगली जिल्ह्यातील औदुंबर येथे महाशिवरात्रीनिमित्त १००८ नारळांपासून साकारलेल्या भव्य शिवलिंगाचा उद्घाटन सोहळा पार पडला. या शिवलिंग सोहळ्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या सोहळ्याचे उद्घाटन शुक्रवार, १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता उद्योजक गिरीश चितळे, उद्योजक राजेश चौगुले आणि भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम वेळी प्रमुख उपस्थिती जिल्हा परिषद सदस्य , प्रतीक पाटील,सुदीप गडदे व पंचायत समिती सदस्या शोभा हजारे,हजरबी सलामत आणि भिलवडी पंचक्रोशीतील मान्यवर उपस्थित.होते . उद्घाटनानंतर ‘जागरण अंतर्मनाचे’ हा आध्यात्मिक कार्यक्रम पार पडला, ज्यामध्ये वक्त्या सुनीता बेहनजी यांनी मार्गदर्शन केले. भिलवडी सेवाकेंद्राच्या संचालिका मीरा बहेनजी यांनी सांगितले की ” ब्रह्माकुमारी संस्थेच्या ९० व्या त्रिमूर्ती शिवरात्री महोत्सवानिमित्त औदुंबर येथे पहिल्यांदाच अशा प्रकारचे नारळाचे शिवलिंग तयार करण्यात आले आहे.या शिवलिंग दर्शनाच्या माध्यमातून मानवातील ईश्वरीय गुणांची जागृती व्हावी हाच आमचा उद्देश आहे ब्रह्माकुमारी विद्यालयात प्रामुख्याने मानवी जीवनातील ताणतणाव दूर करण्यासाठी आणि आंतरिक शांती मिळवण्यासाठी आध्यात्मिक शिक्षण दिले जाते. ईश्वर हा निराकार ज्योतिर्लिंग स्वरूप ‘शिव’ असून तो सर्व गुणांचा सागर आहे,.मनाला एकाग्र करणे आणि स्वतःचा संबंध परमात्म्याशी जोडणे असा सहज राजयोग शिकवला जातो हा सेवाकेंद्रावरती विनामूल्य ७ दिवसांचा राजयोग कोर्स सर्वांसाठी आहे.
औंदुबर येथील या कार्यक्रमास लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन चांगला प्रतिसाद दिला.


