महाराष्ट्र

डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयात दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन

 

 

 दर्पण न्यूज पलूस:-
रामानंदनगर येथील रयत शिक्षण संस्थेचे, डॉ. पतंगराव कदम महाविद्यालया मध्ये
प्राणिशात्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आयोजित व आय .सी. एस .एस. आर . प्रायोजित “बदलते मान्सूनचे स्वरूप आणि भारतीय कृषी अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्र्रीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक २५ व २६ फेब्रुवारी २०२६ रोजी करण्यात येत आहे.
या चर्चासत्रामध्ये बदलत्या मौसमी पाऊस, अवेळी पडणारा पाऊस, काही वेळी होणारी अतिवृष्टी ढगफुटी या सर्व घटकांचा ग्रामीण अर्थव्यस्था, बदलती शेती करण्याची पद्धत अन्नधान्य उत्पादनातील घट अशा विविध विषयावर चर्चा होणार आहे . या चर्चासत्रामध्ये मा. जे .के.जाधव मॅनेजिंग कौन्सिल
सदस्य, रयत शिक्षण संस्था, सातारा हे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहेत तसेच मा. महेंद्र लाड उपाध्यक्ष रयत शिक्षण संस्था, सातारा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या चर्चासत्रामध्ये डॉ . अभयकुमार बागडे राजर्षी छत्रपती महाराज कृषी महाविद्यालय, कॊल्हापूर, प्राचार्य डॉ. अधिकराव जाधव भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव,डॉ. धर्यशील लाड, भारती विद्यापीठाचे लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय, कडेगाव हे मार्गदर्शन करणार आहेत.
या चर्चासत्रांमधून बदलता मौसमी पाऊस यावर मात व शेती करण्याची पद्धत यावर ठोस उपाय शोधण्याचा प्रयत्न केले जाणार आहेत.
या चर्चासत्राचे समन्वयक डॉ. नंदकुमर कांबळे, सह- समन्वयक डॉ. आशिया मोमीन व प्रा.दिनेश ससाणे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष्याचे समन्वयक म्हणून कामकाज पहाणार आहेत.
या चर्चासत्रामध्ये परिसरातील शेतकरी बांधवानी सहभागी सहभागी व्हावे असे आव्हान महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. यू. व्ही. पाटील यांनी व्यक्त केले आहे.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!