पालकरवाङीत कालव्यात पाय घसरून पडल्याने युवकाचा मृत्यू

कोल्हापूरःअनिल पाटील
कालव्यामध्ये पाणी आणण्यासाठी गेले असता पाणी घेत असताना कालव्यामध्ये पाय घसरून पङल्याने बाळासो नारायण भोईटे ( वय 40) रा. पालकरवाङी ता. राधानगरी या युवकाचा बूङून जागीच मृत्यू झाला. या घटनेमूळे गावावर शोककाळा पसरली आहे. ही घटना आज सकाळी 11 वाजण्याच्या सूमारास घङली.
गावापासून 400 मीटरवर असणार्या कालव्याजवळ त्याची शेती आहे. नेहमी प्रमाणे आज सकाळी तो आपल्या कालव्या शेजारील शेताकङे गेला होता. हवेत उष्मा असल्याने त्याला तहान लागली होती म्हणून तो कळशी घेवून पाणी आणण्यासाठी कालव्यामध्ये उतरला होता. पाणी घेत असताना त्याचा पाय घसरल्याने तो पाण्यात पङला.व त्याचा पाण्यात गूदमरून मूत्यू झाला. ही घटना कालव्याजवळ असणार्या शेतातील लोकानां समझली. त्यांनी तात्काळ त्याला कालव्यातून बाहेर काढले.त्यानंतर त्याचे सोळांकूर येथील ग्रामीण रूग्णालयामध्ये शवविच्छेदन करण्यात आले. घटनास्थळी बिद्री साखर कारखाण्याचे संचालक उमेशदादा भोईटे””” विकास पाटील””भाऊ पालकर””यांनी भेट दिली. या घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत झाली आहे.
पालकरवाडी (ता.राधानगरी) येथील बाळासो नारायण भोईटे (वय ४१) यांचा कालव्यामध्ये ११ च्या सुमारास पाणी आणण्यासाठी गेले असता पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला. मनमिळावू आणि कष्टाळू बाळूच्या मृत्यूने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शेती करून कुटुंबाची देखभाल करणारे बाळासो भोईटे नेहमीप्रमाणे कालव्याच्या शेजारी असणाऱ्या शेतामध्ये गेले होते. कालव्यामध्ये पाणी आणण्यासाठी ते गेले असता पाणी घेत असताना त्यांचा पाय घसरल्याने ते पाण्यामध्ये पडले. पोहता न येणाऱ्या बाळासो भोईटे यांना पाणी वाहते असल्याने स्वतःचा जीव वाचवता आला नाही.
काही वेळातच ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली घटनास्थळावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. बाळासो यांना पाण्यातून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय सोळांकूर येथे नेण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषीत करुन शवविच्छेदन केले. या घटनेची फिर्याद पोलीस पाटील शंकर पोतदार व सुभाष भोईटे यांनी राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये दिली अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल पी डी गुरव व करत आहेत.
त्यांच्या पश्चात आई-वडील पत्नी व दोन मुले असा परिवार आहे. बाळासो भोईटे यांच्या अपघाती निधनाने आई -वडील, पत्नी व मुलांनी फोडलेल्या हंबरड्याने सर्वांचे डोळे पाण्यावले होते.