महाराष्ट्र
नागठाणे येथे मुस्लिम समाजामार्फत सत्ताविसाव्या रोजा निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन : मान्यवरांची उपस्थिती

भिलवडी: – नागठाणे येथे मुस्लिम समाजामार्फत सत्ताविसाव्या रोजा निमित्त इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी पलूसचे तहसीलदार निवास ढाणे भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन सावंत , अमरावती न्यायालयाचे न्यायाधीश संतोष जाधव व पलुस तहसीलचे निवासी नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, सामाजिक कार्यकर्ते राहुल कांबळे, नागठाणे पोलीस पाटील, दिपक कराडकर याप्रसंगी उपस्थित होते .
या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक गौसमहमद लांडगे यांनी केले मनोगत तहसीलदार निवास ढाणेसाहेब भिलवडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन सावंत साहेब यांनी केले याप्रसंगी उपस्थित बाबासाहेब मुलाणी झाकीर लांडगे हाजी बाबासो मुल्ला आदम मुल्ला इनुस तांबोळी नबीलाल मुल्ला रफीक मुल्ला आभार रसुल नदाफ यांनी मानले.