विटा बसस्थानक एस.टीतून चोरीला गेलेले २ लाख ४५ हजाराचे दागिन्यांची चोरी उघडकीस; विटा पोलिसांना यश : जळगाव येथील महिला ताब्यात..
.
विटा प्रतिनिधी (शिराज शिकलगार) :
विटा शहरात विटा बस स्थानक येथून सहा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता विटा कोल्हापूर गाडीने कोल्हापूर जिल्ह्यातील किणी वाठार येथील फातीमा सलीम मुलाणी या गावी जात असताना कोणी अज्ञात चोरट्यांनकडून त्यांच्या पर्समधून ४८. ६६० ग्रॅमचे वजनाचे सोन्याचे दागिने व रोख १५०० रूपये असे अंदाजे २लाख ४३ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. या संदर्भात विटा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता याच अनुषंगाने विटा पोलीस ठाणे तपास कामी गुन्हे प्रकटीकरण पथकाकडील पोलीस अंमलदार हे विटा पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना दिनांक ७ रोजी पोहे. काॅ.हणमंत लोहार व पोकाॅ. महेश देशमुख यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक महिला इसम विटा बस स्थानकाता संशयित फिरत आहे असं माहिती मिळाली या माहितीच्या आधारे त्या महिलेला विटा पोलीसांनी ताब्यात घेऊन तिच्याकडे या संदर्भात चौकशी केली असताच सदर या महिलेने ही चोरीची कबुली संबंधित विटा पोलीस पथकाला चौकशी दरम्यान दिली . सदर त्या महिलेकडून सर्व सोन्याचे दागिने सह रक्कम विटा पोलीसांनी जप्त केली.ही कामगिरी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली साहेब व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम व विटा उपविभागिय पोलीस अधिकारी श्रीमती पद्मा कदम मॅडम यांच्या आदेशानुसार विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली २४ तासांच्या आत विटा बस स्थानकातून महिलेचे चोरीस गेलेले दागिने व रोख रक्कम महिला आरोपी अनु साई जाधव वय वर्षे (४०) जळगाव जिल्ह्यातील जळगाव येथील महिला आरोपी कडून जप्त केले.ही दमदार कामगिरी विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष डोके साहेब तसेच पोहेकाॅ . हणम़ंत लोहार. सुरेश भोसले . पो शि. रोहित पाटील . पो.काॅ. अक्षय जगदाळे. मपोना मनीष खाडे .पो.हे.काॅ. अमरसिंह सुर्यवंशी. पो.ना. शशिकांत माळी. पो.काॅ.सागर निकम .महेश देशमुख. मपोकाॅ . स्वाती खरमाटे या विटा पोलीस ठाणे टीमने दमदार कामगिरी करत सह पोहेकाॅ. दादासो ठोंबरे व सुजाता जगदाळे मपोकाॅ दोन्ही _ नेम आटपाडी पोलीस ठाणे यांनीही कामगिरी केली या दमदार कामगिरी बद्दल व २४ तासांच्या आत विटा बस स्थानकातून चोरीस गेलेले सोन्याचा तपास करून चोरी उघडकीस आणून सर्व मुद्देमाल जप्त केल्याबद्दल विटा शहरातून विटा पोलिसांची विटेकर नागरिकांतून कौतुक होत आहे .