ताज्या घडामोडी
भिलवडी येथे स्व.काकासाहेब चितळे यांना सार्वजनिक वाचनालयाचे वतीने अभिवादन

भिलवडी :उद्योगपती व सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे अध्यक्ष स्व.काकासाहेब चितळे यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन करण्यात आले.
श्रीमती सुनीता चितळे वाहिनी यांचे हस्ते स्वर्गीय काकासाहेब चितळे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी वाचनालयाच्या बाबतीत असणाऱ्या काकासाहेब चितळे यांच्या स्वप्नांना मूर्त स्वरूप देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे मनोगत व्यक्त केले.कार्यवाह सुभाष कवडे यांनी प्रास्ताविक केले.
उद्योजक मकरंद चितळे,
शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड,
कार्यवाह सुभाष कवडे,विश्वस्त जी.जी.पाटील,डी.आर.कदम,
भू.ना.मगदुम,प्राचार्य डॉ.दिपक देशपांडे,प्रदीप शेटे,अशोक साठे, डॉ.जयकुमार चोपडे,आदींसह सभासद,वाचक उपस्थित होते.