१ कोटी ४५ लाख रुपयांच्या भूमीपूजनामुळे भिलवडीचा विकास होणार ; माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजीत कदम
भिलवडी येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन ; रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड यांची उपस्थिती




दर्पण न्यूज पलूस/
भिलवडी:(अभिजीत रांजणे)
भिलवडी येथे विकासकामांच्याबाबत मी कधीच कमी पडत नाही. १ कोटी ४५ लाख रुपयांच्या भूमीपूजनामुळे भिलवडीचा विकास होणार आहे, असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.भिलवडी येथे विविध विकासकामांचे भूमीपूजन आणि उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. भिलवडी येथे १ कोटी ४५ लाख रुपये निधीच्या विकासकामे भूमिपूजन करण्यात आले .
दरम्यान, आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी साखरवाडी येथील हजरत पीर मदनशाह वली (रह.) उरूसानिमित्त दर्ग्यास भेट देऊन दर्शन घेतले. या विकासकामांत सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प करणे ५० लाख, पंचशिलनगर शिवाजी लिफ्ट कॉर्नर ते बिरोबा मंदिर रस्ता डांबरीकरण करणे १५ लाख, ग्रा.पं. हद्दीतील मिळकत नं.१८०३ मध्ये सभामंडप बांधणे (पांढरी मस्जिद). १० लाख, वार्ड क्र.६ अंतर्गत रस्ते व गटर करणे १५ लाख, कांबळे वस्ती मध्ये बंदिस्त गटर करणे १० लाख, दत्तनगर अंतर्गत बंदिस्त गटर करणे ४ लाख, वारे वस्तीमध्ये बंदिस्त गटर करणे ६ लाख, मोरे वस्तीमध्ये बंदिस्त गटर व रस्ता करणे १० लाख या विकासकामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले.
रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड म्हणाले,
या सर्व विकासकामांमुळे ग्रामस्थांना सुरक्षित व स्वच्छ परिसर मिळण्यास मोठी मदत होणार आहे . भिलवडीच्या विकासाला नवी दिशा मिळेल.
कंत्राटदारांना काम लवकर व दर्जेदार करण्याची सूचनाही डॉ. कदम यांनी दिली.यावेळी प्रशासकीय अधिकारी, सरपंच , माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


