भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचा ७२वा वाचन कट्टा उत्साहात

दर्पण न्यूज भिलवडी/ पलूस:- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी
७२वा वाचन कट्टा नुकताच 1 डिसेंबर 2025 रोजी वाचनालयाच्या अभ्यासिकेत उत्साहात संपन्न झाला .या वाचन कट्ट्याच्या अध्यक्षस्थानी गिरीश चितळे होते. माझे दिवाळी अंकांचे वाचन या विषयावर हा वाचन कट्टा संपन्न झाला. प्रारंभीन वाचन कट्टा संयोजक कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून प्रास्ताविकात दिवाळी अंकाच्या वाचनालयाच्या उपक्रमाची सविस्तर माहिती सांगितली. प्रारंभी वाचनालयाचे अध्यक्ष गिरीश चितळे यांनी वाचनालयास पन्नास हजार रुपयांची बहुमोल देणगी दिल्याबद्दल तसेच शिवाजी विद्यापीठाच्या फूड टेक्नॉलॉजी या विभागात प्रोफेसर इन प्रॅक्टिस या पदावर निवड झाल्याबद्दल वाचनालयाचे वतीने शाल आणि भारताचे संविधान हा ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर या वाचन कट्ट्यावर प्रथमेश वावरे ह.रा.जोशी जयंत केळकर, पुरुषोत्तम जोशी,उर्मिला डिसले रमेश चोपडे कुमार चौगुले सुभाष कवडे डी. आर.कदम तुकाराम पाटील जी. जी. पाटील आणि महावीर शेडबाळे सर यांनी वाचलेल्या दिवाळी अंकांबद्दल अभ्यासपूर्ण माहिती सांगितली यावेळी छावा , मुलांचे मासिक,हास्यानंद ,भन्नाट, मौज ऋतुरंग चौफेर समाचार साधना जडणघडण काल निर्णय शतायुषी कुंपण पुण्यनगरी साधना बालकुमार दिवाळी अंक आधी दिवाळी अंकांच्या बद्दल विस्तार पूर्वक चर्चा झाली जयंत केळकर यांनी आभार मानले अमृत महोत्सवी वाचन कट्टा विविध उपक्रमांनी संपन्न करण्याबाबतही चर्चा झाली यावेळी या वाचन कट्ट्याचे संयोजन कार्यवाह सुभाष कवडे ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखनिक विद्या निकम सेवक माधव काटीकर यांनी केले यावेळी वाचनालयाचे सभासद व वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.


