महाराष्ट्रराजकीय
काँग्रेस पक्षाचे जि प गटातील उमेदवार प्रतीक पाटील,प स गणातील उमेदवार हजराबी सलामत यांनी माळवाडी पिंजून काढली ; महिला, ज्येष्ठ लोकांचा आशिर्वाद






दर्पण न्यूज भिलवडी/पलूस (अभिजीत रांजणे) :- सांगली जिल्हा परिषद आणि पलूस पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पक्षाचे जिल्हा परिषद भिलवडी गटातील उमेदवार प्रतीक पाटील, काँग्रेस पक्षाच्या भिलवडी पंचायत समिती गणातील उमेदवार हजराबी सलामत यांनी माळवाडी येथील घरंघर पिंजून काढले. मतदार बंधू-भगिनींना मतदान करण्याचे आवाहन करत असताना या दोन्ही उमेदवारांना महिला आणि ज्येष्ठ आशीर्वाद दिले.
भिलवडी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
भिलवडी पंचायत समिती गणातील
हजराबी बालेचाँद सलामत, भिलवडी जिल्हा परिषद गटातील प्रतिक संग्राम पाटील यांनी माळवाडी येथे घरोघरी प्रचार केला.माळवाडी येथील प्रचारासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.





