महाराष्ट्रसामाजिक

भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी चा 74 वा वाचन कट्टा उत्साहात

 

दर्पण न्यूज भिलवडी पलूस :- सार्वजनिक वाचनालय भिलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली यांचे वतीने 1 जानेवारी 2026 रोजी 74 वा वाचन कट्टा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्ष स्थानी वाचनालयाचे उपाध्यक्ष श्री डी आर कदम सर होते. प्रारंभीर कार्यवाह सुभाष कवडे यांनी सर्वांचे स्वागत करून माझे साप्ताहिके पाक्षिके आणि मासिके या विषयांचे वाचन हा विषय असल्याचे सांगून हा विषय चौफेर वाचनासाठी आवश्यक असल्याचे सांगितले. या वेळी सुभाष कवडे सर जयंत केळकर भूना मगदूम पुरुषोत्तम जोशी उर्मिला दिसले वहिनी रमेश चोपडे सर हकीम तांबोळी एचआर जोशी जयदीप पाटील जी जी आप्पा यांच्यासह वाचकांनी आपण वाचलेल्या मासिकांच्या बद्दल सादरीकरण केले यामध्ये प्रामुख्याने साधना ललित गृहशोभिका शतकोत्तर रोप्य महोत्सवी आचार्य अत्रे साप्ताहिक सकाळ जडणघडण इत्यादी मासिकांचा पाक्षिकांचा वापर करण्यात आला क्रांती अग्रणी पर्व हे देखील वाचनीय असल्याचे मत जी जी आप्पा पाटील यांनी व्यक्त केले श्रीयुत जयंत केळकर यांनी शेवटी आभार मानले एक फेब्रुवारी रोजी अमृत महोत्सवी वाचन कट्टा संपन्न होणार असून या निमित्ताने वाचन चळवळ रुजविणारे तीन दिवसांचे कार्यक्रम आयोजित केले जाणार असल्याची माहिती संयोजक व कार्यवाह सुभाष कवडे यांनी दिली. वाचन कट्ट्याचे संयोजन ग्रंथपाल मयुरी नलवडे प्रमुख लेखनिक विद्या निकम सेवक माधव काटीकर यांनी केले. यावेळी वाचक बहुसंख्येने उपस्थित होते.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!