
दर्पण न्यूज भिलवडी/अंकलखोप (अभिजीत रांजणे) :- पलूस कडेगाव मतदार संघाचे विद्यमान आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप भैय्या गडदे आणि अमणापूर पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव उगळे यांचा प्रचार संतगाव येथे सुरू आहे. या प्रचारामध्ये शेकडो काँग्रेसची अनुयायी उपस्थित होते .या प्रचाराला मतदार बंधू-भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे.
अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप भैय्या गडदे, अंकलखोप पंचायत समिती गणातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार जितेश बनसोडे आणि अमणापूर गणातील पंचायत समिती गणातील उमेदवार वैभव उगळे यांनी काही दिवसापासून आपला प्रचार आपल्या अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांना घेऊन सुरू केला आहे. या प्रचारामध्ये महिलांसह ग्रामस्थ, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
संतगाव येथील काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या पदयात्रा आणि घरोघरी प्रचाराच्या वेळी अंकलखोप संतगाव आणि इतर गावातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
