महाराष्ट्रराजकीय

आमदार डॉ विश्वजीत कदम यांचा दुधोंडी जिल्हा परिषद गटातील नागरिकांशी संवाद ; लोकनेते जे के बापू जाधव यांची उपस्थिती

दुधोंडी, नागराळे, पुणदीवाडी, दह्यारी व तुपारी येथे कोपरा सभा ; लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

दर्पण न्यूज पलूस/ दुधोंडी (अभिजीत रांजणे) -:

सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक प्रचाराच्या निमित्ताने पलूस येथील दुधोंडी जिल्हा परिषद गटातील दुधोंडी, नागराळे, पुणदीवाडी, दह्यारी व तुपारी येथे कोपरा सभा घेऊन आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी नागरिकांशी संवाद साधला.

यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम म्हणाले की, काँग्रेस विचार हा स्वातंत्र्य, समता, बंधुता व सामाजिक न्याय या मूल्यांवर आधारित आहे. लोकशाहीची मजबुती, धर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकता आणि सर्वसामान्य माणसाच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देणारा काँग्रेस विचार आहे. या विचारांची आज खऱ्या अर्थाने गरज आहे. सत्ताधाऱ्यांच्या हुकूमशाही धोरणाला पायबंद घालायचा असेल तर त्याची सुरुवात गावपातळीवरून झाली पाहिजे. या निवडणुकीत ती संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मतदारांनी ‘हात’ चिन्हासमोरील बटन दाबून काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!