ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
अंकलखोप जि प गटातील काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे, आमणापूर पं स गणातील उमेदवार वैभव उगळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा : पलुस कडेगांव विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्षा प्रणाली पाटील

दर्पण न्यूज भिलवडी/ अंकलखोप (अभिजीत रांजणे):- अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेसचे पक्षाचे उमेदवार सुदीप भैया गडदे व आमणापूर पंचायत समिती गणातील उमेदवार वैभव दादा उगळे यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे आवाहन पलुस कडेगांव विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्षा सौ प्रणाली पाटील यांनी केले. आमणापूर प्रचार सभेत त्या बोलत होत्या.
यावेळी प्रणाली पाटील म्हणाल्या ,आमणापूर गाव हा स्वर्गीय डॉ पतंगराव कदम साहेब व रामभाऊ उगळे सर यांच्या विचारांचा वरसा घेऊन पुढे जाणारे गाव आहे. काँग्रेस पक्षाच्या दोन्ही उमेदवारांना विजयी करा . डॉ विश्वजीत कदम साहेब यांचे हात बळकट करा, असे आवाहन ही पाटील यांनी केले.
या प्रचारासाठी अंकलखोप नागठाणे धनगाव आमणापूर गावांसह इतर गावांतील काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




