








दर्पण न्यूज भिलवडी वसगडे (अभिजीत रांजणे):- जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून वसगडे येथील जनता काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना निवडून देणार असे प्रतिपादन माजी सहकार मंत्री तथा आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी केले.
भिलवडी जिल्हा परिषद गटामधील वसगडे, खटाव, ब्रम्हनाळ व खंडोबाचीवाडी गावांना भेटी देऊन काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारार्थ आमदार डॉ विश्वजीत कदम बोलत होते.
आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, आजवर ग्रामपातळीवर अत्यंत प्रामाणिकपणे व सातत्याने काम करत आमच्या प्रत्येक उमेदवाराने लोकांचा विश्वास संपादन केला आहे. पुरोगामी विचारांना जागून शिक्षण, विकास, सामाजिक न्याय आणि सर्वसमावेशक लोकसेवा हीच भूमिका त्यांनी आजवर जपली असून, याच कार्याची पावती आज जनतेकडून मिळत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसून येत आहे. हे चित्र ७ फेब्रुवारी रोजी मतदान दिवशी अतिशय चांगल्या प्रकारे परावर्तित होईल, हा आम्हाला विश्वास आहे.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. या प्रचारासाठी भिलवडी, माळवाडी,वसगडे, ब्रम्हनाळ, खंडोबाची वाडी, खटाव येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य काँग्रेस पक्षाचे उमेदवार, कार्यकर्ते पदाधिकारी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

