महाराष्ट्रराजकीय

घोगाव येथे आमदार डॉ विश्वजीत कदम यांचे कुंडल गटाचे काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश लाड, कुंडल पं स गणाच्या उमेदवार हेमा पवार-पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन

 

दर्पण न्यूज पलूस/कुंडल (अभिजीत रांजणे)-:सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुंडल जिल्हा परिषद गटातील  काँग्रेसचे  उमेदवार ऋषिकेश महेंद्रआप्पा लाड ,  कुंडल पंचायत समिती गणाच्या उमेदवार हेमा पवार-पाटील यांना विजयी करा, असे आवाहन आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी घोगाव येथे केले.

यावेळी आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले की, पुरोगामी विचारांचा वारसा जपणारा आमचा ऋषिकेश आणि काँग्रेसचे आमचे उमेदवार आजवर लोकसेवेचे काम प्रामाणिकपणे करीत आले आहेत. सामाजिक बांधिलकी, सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण आणि विकासाभिमुख दृष्टिकोन हीच त्यांच्या कामाची ओळख आहे. आमच्या भगिनी स्व. भारतीताई यांच्या अकाली निधनानंतर  महेंद्रआप्पा लाड यांनी सावरत कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पेलली. त्यांनी ऋषिकेशला केवळ राजकारणाची नाही, तर सेवेची, संवेदनशीलतेची आणि माणुसकीची शिकवण दिली. याच संस्कारातून घडलेला ऋषिकेश आज जनतेच्या विश्वासास पात्र राहून जनतेच्या सुख-दुःखात कायम सहभागी राहणारा नेतृत्वाचा चेहरा म्हणून पुढे येत आहे. मोठ्या प्रमाणात माता-भगिनी त्याच्या सोबत आहेत. 7 फेब्रुवारी रोजी सर्वांचे आशीर्वाद त्याला नक्कीच लाभतील, असे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी सांगितले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी  काँग्रेसच्या पलूस कडेगांव मतदारसंघाच्या युवक उपाध्यक्षा प्रणाली पाटील, कुंडल, पलूस आणि इतर गावांतील काँग्रेसचे कार्यकर्ते महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!