महाराष्ट्रराजकीय

कुंडल जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड यांचा धूमधडाक्यात प्रचार

आमदार डॉ विश्वजीत कदम, महेंद्र आप्पा लाड, रोहन लाड यांचा सक्रिय सहभाग

दर्पण न्यूज पलूस/कुंडल (अभिजीत रांजणे)-:
सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षांकडून कुंडल जिल्हा परिषद गटातून ऋषिकेश महेंद्रआप्पा लाड, कुंडल पंचायत समिती गणातून हेमा पवार , बांबवडे पंचायत समिती गणामधून सुवर्णा पांडुरंग संकपाळ या निवडणुकीसाठी उभ्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून ऋषिकेश महेंद्र लाड यांनी धुमधडाक्यात प्रचराला सुरुवात केली आहे. या प्रचारासाठी विद्यमान आमदार डॉ विश्वजीत कदम, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड आणि युवा नेते रोहन लाड यांच्यासह अनेक दिग्गजांचा सक्रिय सहभाग आहे ‌.

कुंडल जिल्हा परिषद गटातील  काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह ज्येष्ठ मंडळी, महिलांना आणि युवकांना आपल्या बरोबर घेऊन घर घर पिंजून काढून मतदारांना मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आव्हान करत आहेत.  यामुळे कुंडल पंचायत समिती गण आणि बांबवडे पंचायत समिती गणातील उमेदवार यांना मोठा आधार मिळत आहे.

आदरणीय स्व. भारतीताई लाड यांच्या पश्च्यात ऋषिकेश लाड यांना कुंडल जिल्हा परिषद गटातील माता भगिनींकडून सहानुभूती मिळत आहे.

आमदार डॉ विश्वजीत कदम आणि रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र आप्पा लाड यांनी या प्रचारामध्ये सहभाग घेऊन कुंडल  जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार ऋषिकेश लाड कुंडल पंचायत समिती गणातील उमेदवार हेमा पवार आणि बांबवडे पंचायत समिती गणातील उमेदवार सुवर्णा संकपाळ यांना मोठ्या संख्येने निवडून देण्यासाठी लोकांना आवाहन करत आहेत.

काँग्रेस पक्षाचे युवा नेते रोहन लाड हेही प्रचारामध्ये सक्रिय दिसत असून ते कुंडल जिल्हा परिषद गटातील सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना मोठ्या मताने निवडून देण्याचे आवाहन करत आहेत.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!