धनगाव येथे अंकलखोप जि प गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे, अमणापूर पं स गणाचे उमेदवार वैभव उगळे यांचा जोरदार प्रचार
धनगाव गाव हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला : पलूस बाजार समितीचे अध्यक्ष, काँग्रेस पक्षाचे नेते सतपाल काका साळुंखे


दर्पण न्यूज भिलवडी /पलूस (अभिजीत रांजणे) :- सांगली जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी धनगाव येथे अंकलखोप जिल्हा परिषद गटातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप गडदे, अमणापूर पंचायत समिती गणाचे उमेदवार वैभव उगळे यांचा जोरदार प्रचार सुरू आहे.
धनगाव येथे जिल्हा परिषद गटाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुदीप भैय्या गडदे, अमणापूर पंचायत समिती गणाचे काँग्रेस पक्षाचे उमेदवार वैभव दादा उगळे यांचा सुरू असताना पलूस बाजार समितीचे अध्यक्ष, धनगावचे काँग्रेस पक्षाचे नेते सतपाल काका साळुंखे यांनी सांगितले, की धनगाव गाव हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे. कोणत्याही आमिषाला बळी न पडता दोन्ही उमेदवारांना आम्ही भरघोस मतांनी विजयी करू तसेच आमदार डॉ विश्वजीत कदम साहेब यांचे हात बळकट करू, असे सांगितले.
या प्रचाराच्या वेळी काँग्रेस पक्षाचे अंकलखोप, धनगाव आणि इतर गावांतील पदाधिकारी, कार्यकर्ते, धनगावातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.




