कोल्हापुरातील महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा



कोल्हापूर, अनिल पाटील
येथील श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस कोल्हापूर या संस्थेचे महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर या शाळेत क्रीडा महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
महाराष्ट्र हायस्कूलची भूमी ही क्रीडानगरी आहे. या नगरीने आपल्या राष्ट्राला अभिप्रेत असणारे अनेक खेळाडू घडविले. या पुढे ही क्रीडा क्षेत्रातील दबदबा महाराष्ट्र हायस्कूलने कायमस्वरूपी टिकवून ठेवावा असे मत कोल्हापूर महानगर पालिकेचे क्रीडानिरीक्षक श्री सचिन पांडव यांनी व्यक्त केले. ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्याचे क्रीडा मार्गदर्शक श्री. अनिकेत बोडके हे देखील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाराष्ट्र हायस्कूल मध्ये आदर्श नागरिक घडविण्याचे काम अखंडपणे चालू आहे त्यामुळेच या शाळेचा किंबहुना संस्थेचा मी चेअरमन असल्याचा मला सार्थ अभिमान वाटतो असे गोरवोद्गार संस्थेचे चेअरमन डॉ. के. जी. पाटील यांनी काढले. ते कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलन करण्यात आले. ही क्रीडा ज्योत घेऊन शाळेतील राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळलेल्या खेळाडूंनी मैदानाला फेरी मारली. शाळेचा राष्ट्रीय फुटबॉल खेळाडू कु. साईराज सुतार याने सर्वांना क्रीडा प्रतिज्ञा दिली.
या क्रीडा महोत्सवामध्ये खो- खो, कबड्डी, हॅन्डबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल आणि फुटबॉल या सांघिक क्रीडा प्रकारांचा तर १०० मीटर, २०० मीटर धावणे, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळीफेक व भालाफेक या वैयक्तिक क्रीडा प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. सांघिक क्रीडा प्रकारासाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध रंगाचे किट्स परिधान केले आहेत.
कार्यक्रमाची प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्राचार्य श्री. यु. आर. आतकिरे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार उपमुख्याध्यापक श्री. एस. ए. जाधव यांनी मानले तर सूत्रसंचलन क्रीडा शिक्षक श्री. संदीप पाटील यांनी केले.
यावेळी उपप्राचार्या सौ. व्ही. एस. कांबळे, पर्यवेक्षक श्री एस. व्ही. शिंदे, सौ. एस. एस. ठोंबरे, टेक्निकल विभाग प्रमुख श्री. बी. बी. मिसाळ, क्रीडा विभाग प्रमुख श्री. प्रदिप साळोखे, शिक्षक- शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी, विदयार्थी- विदयार्थीनी उपस्थित होते.



