महाराष्ट्रराजकीयसामाजिक
जिल्ह्यातील सर्वच मतदारांचे मनःपूर्वक आभार : भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुणे) :-
धाराशिव- नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये जिल्ह्यातील मतदारांनी दाखवलेल्या शांत, संयमी आणि उत्साही प्रतिसादाबद्दल भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी जिल्हावासियांचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे आभार मानले आहेत. नागरिकांनी जबाबदारीची जाण ठेवत मतदानात सहभाग नोंदवला असून प्रत्येक मत हे स्थानिक विकासासाठी निर्णायक ठरणारे आहे. हा उत्स्फूर्त सहभाग लोकशाहीवरील दृढ विश्वास अधोरेखित करणारा आहे. याबरोबरच निवडणूक प्रक्रिया शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावी यासाठी निवडणूक आयोग, पोलिस विभाग आणि संपूर्ण प्रशासनाचे योगदानही मोठे आहे. तुळजापूर, नळदुर्ग, उमरगा, मुरुम, कळंब, भूम, परंडा अगदी सर्वच नगरपालिकेतील नागरिकांनी मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या मतदानाचा हक्क बजावला आहे.



