महाराष्ट्रसामाजिक

सिद्धीविनायक परिवाराकडून रक्तदान शिबिर; दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त राबवला उपक्रम

 

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी ( संतोष खुणे) :-
धाराशिव- श्री सिद्धीविनायक परिवाराच्या वतीने संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. शिबिरात एकूण ८५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवित मानवतेची श्रेष्ठ सेवा साकारली. शिबिरामध्ये खामसवाडी येथील श्री सिद्धीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रा. लि. येथून ६५ रक्तदाते, तर जिल्हा न्यायालय येथील श्रीसिद्धीविनायक मल्टीस्टेट येथील शिबिरात २० रक्तदाते सहभागी झाले. धाराशिव शहरातील सह्याद्री ब्लड बँक आणि शासकीय रक्तिपेशी यांनी पार पाडली. ग्रीनटेक इंडस्ट्रीजतर्फे कार्यकारी संचालक गणेश कामटे, संचालक प्रथमेश आवटे, बलराम कुलकर्णी, अक्षय शेळके, शेतकी अधिकारी विकास उबाळे, केन अकाउंटंट अमित कुरुळे आणि अभय शिंदे यांनी शिबिराचे मार्गदर्शन केले. तर जिल्हा न्यायालयातील मल्टीस्टेट शाखेकडून अतिरिक्त सीईओ अरविंद गोरे, शाखा व्यवस्थापक प्रज्वल जाधव, तसेच नितीन हुंबे, अविनाश पवार, रंजित भोरे यांनी सक्रिय सहभाग घेत आयोजन यशस्वी केले.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!