पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या 3 रोजी प्रसिध्द होणार

दर्पण न्यूज मिरज / सांगली : सांगली जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर, सर्व विधानसभा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द करण्यात येणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी नीता सावंत-शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे कळविले आहे.
मा. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ या अर्हता दिनांकावर आधारित पुणे विभागातील पदवीधर व शिक्षक मतदार संघासाठी नव्याने (De-Novo) मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम घोषित केला आहे. दि. ६ नोव्हेंबर २०२५ अखेर प्राप्त झालेल्या अर्जास अनुसरुन प्रारूप मतदार यादी प्रसिध्द करण्यात येत आहे. दि. १४ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित केलेल्या सुधारीत कार्यक्रमानुसार दिनांक ०३ डिसेंबर २०२५ रोजी प्रारुप मतदार याद्या जिल्हाधिकारी कार्यालय सांगली, जिल्ह्यातील सर्व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय तसेच मतदान केंद्रावर प्रसिध्द करण्यात येत असल्याचे प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.



