बौद्ध-मातंग समाजाने विकासासाठी एकत्र यावे : केंद्रीय मंत्री रामदास आठवले
कोल्हापूर दसरा चौक येथे मातंग समाज न्याय हक्क परिषद

दर्पण न्यूज कागल तालुका प्रतिनिधी मारूती डी कांबळे कोल्हापूर -: बौद्ध-मातंग हे समाज भाऊ-भाऊ आहेत. गटातटात विखुरलेल्या या समाजांनी विकासासाठी एकत्र यावे. या समाजाचा निळा-पिवळा झेंडा एकत्र आल्यास समाजाचे हित होईल, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी सांगितले. दलित पँथरपासून कोल्हापूर जिल्ह्याने
चळवळीला चांगली साथ दिली. त्यात मातंग समाजाचेही योगदान मोठे आहे. यापुढे मातंग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर असल्याचेही आठवले म्हणाले. रिपब्लिकन पक्षाच्या वतीने आयोजित मातंग समाज न्याय हक्क परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. दसरा चौकात ही परिषद झाली.
आठवले म्हणाले, संविधान मान्य डा नाही, त्यांना देशात राहण्याचा अधिकार नाही. वैचारीक मतभेद असू शकतात. न पण पक्ष चालविण्यासाठी सर्व जाती-बा धर्माचे लोक आवश्यक आहेत. सर्वांना . सोबत घेऊन रिपब्लिकन पक्षाची वाटचाल सुरू आहे. काही ठिकाणी मनुवादी विचारांचे लोक डोकं वर काढत आहेत. परंतू ज्यांना संविधान मान्य नाही, त्यांना भारतात राहण्याचा
कोल्हापूर दसरा चौकात आयोजित मातंग समाज न्याय हक्क परिषदेत बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले. मच्छिद्र सकटे, उत्तम कांबळे, शहाजी कांबळे, आण्णा वायदंडे, गौतम सोनवणे, विजय काळे, बी. के. कांबळे, परशुराम वाडेकर, बळवंत माने, अशोक गायकवाड, मंगलराव माळगे आदी उपस्थित होते.
पाकडे… तुम्ही काही करू शकत नाही आमचे वाकडे!
आठवले यांनी पाकिस्तानवर कवितांच्या माध्यमातून हल्ला
चढविला. पाकिस्तानमध्ये जेवढे मुस्लिम आहेत, त्यापेक्षा जास्त मुस्लिम भारतात राहतात. ते भारतीय आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. पाकिस्तान आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहत आहे, पण त्यांना आमचे सांगणे आहे की, ‘पाकडे… तुम्ही आमचे काही करू शकत नाही वाकडे’!
पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊ. वेळ आली तर पाकिस्तानही ताब्यात घेऊ, असेही आठवले म्हणाले.
मच्छिद्र सकटे यांनी, अॅट्रॉसिटीचा कायदा कडक करण्याची गरज आहे, असे सांगितले. रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे यांनी बौध्द व मातंग समाजात भांडणे लावण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचा आरोप केला.
संजय लोखंडे यांनी स्वागत केले. प्रा. शहाजी कांबळे, आण्णा वायदंडे, गौतम सोनवणे, विजय काळे, बी. के. कांबळे, परशुराम वाडेकर, बळवंत माने, अशोक गायकवाड, मंगलराव माळगे आदींनी मनोगत व्यक्त केले.