पलूस येथे 30 वी वरिष्ठ राज्य सॉफ्टबॉल महिला अजिंक्यपद स्पर्धेची जयंत तयारी

रामानंदनगर पलूस शिक्षण प्रसारक मंडळ, पलूस क्रीडांगणावर दिनांक 20 मे 2025 ते 22 मे 2025 रोजी 30वी वरिष्ठ राज्य सॉफ्टबॉल महिला अजिंक्यपद स्पर्धा संपन्न होणार असून या स्पर्धेची जयंत तयारी करण्यात आलेली आहे. स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्यातून 25 जिल्ह्याचे महिला संघ सहभागी होणार आहेत.
स्पर्धेचे उद्घाटन 20 मे 2025 रोजी सायंकाळी आयोजित करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन शरद लाड चेअरमन क्रांती अग्रणी जी डी बापू लाड सहकारी साखर कारखाना करणार आहेत .
अध्यक्ष प्रकाश पुदाले, सचिव महाराष्ट्र राज्य सॉफ्टबॉल असोसिएशन प्रदीप तळवेकर, डॉ.आशा पाटील, संदेश कुलकर्णी, सचिव धोंडीराम शिंदे, जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर ,पोलीस निरीक्षक संदीप पाटील ,प्राचार्य डॉ.आर एस.साळुंखे, माजी नगरसेवक निलेश येसुगडे, व्हा.चेअरमन क्रांती सहकारी साखर कारखाना दिगंबर पाटील, उद्योजक अरुण ब्रम्हे, सांगली जिल्हा सचिव अभय बीराज, संतोष साळुंखे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थित संपन्न होणार आहे तरी जिल्ह्यातील सर्व खेळाडूंनी या स्पर्धेसाठी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.