महाराष्ट्रराजकीय

नागठाणे गावच्या सरपंचपदी रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांची निवड ; आमदार डॉ विश्वजीत कदम यांच्याकडून शुभेच्छा

निवडणुकीत काँग्रेसच्या सरपंच लांडगे यांना भाजपचा उघडपणे पाठिंबा ; लांडगे कुटुंबाच्या सामाजिक कार्याला यश

 

दर्पण न्यूज नागठाणे :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील नागठाणे गावच्या सरपंच पदाच्या  अटीतटीच्या लढतीत रमिजा लांडगे यांना पंधरा पैकी ८ मते तर योगिता विजयकुमार शिंदे यांना ७ मते मिळाली एकुण १५ जागा असलेल्या ग्रामपंचायतीच्या रमिजा लांडगे यांना आठ मते मिळवून त्या सरपंचपदी विजयी झाल्या. या निवडणुकीत काँग्रेसच्या सरपंच लांडगे यांना भाजपचा उघडपणे पाठिंबा मिळाला . तर लांडगे कुटुंबानी आज पर्यंत नागठाणे गावासाठी केलेल्या सामाजिक कार्याला यश मिळाल्याची चर्चा ही लोकांतून होत आहे.

या निवडणुकीसाठी मंडलाधिकारी राजु जाधव यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्राम महसुल अधिकारी सुमेध पठाणे, ग्रामविकास अधिकारी यशवंत चव्हाण, पोलिस पाटील दिपक कराडकर, महसुल सेवक मुबारक शिराळकर यांनी कामकाज पाहिले. सदरची निवडणूक प्रक्रिया सुरू असताना नागठाणे येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांची सरपंचपदी निवड होताच नागठाणे येथील
युवकांनी फटाक्यांची आतीषबाजी व गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला. सरपंच पदी निवड झाल्यानंतर
रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांनी ग्रामदैवत नागेश्वर मंदिर व भैरवनाथ मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले.
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. निवडणूक प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. रमिजा लांडगे या झाकीरहुसेन बाबासाहेब लांडगे यांच्या पत्नी आहेत.झाकीरहुसेन बाबासाहेब लांडगे यांनी देखील यापूर्वी सरपंचपद भूषविले आहे.त्यामुळे पती..पत्नी सरपंच होण्याची नागठाणे गावच्या इतिहासातील
पहिलीच घटना आहे. या निवडणुकीसाठी मैदानात असणाऱ्या रमिजा लांडगे या काँग्रेसच्या कट्टर समर्थक असताना देखील त्यांना भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी पाठिंबा दिला. या गोष्टीची नागठाणे गावात चर्चा सुरू आहे.
रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांच्या गळ्यात सरपंच पदाची माळ पडताच काँग्रेस व भाजपचे कार्यकर्ते गुलालात रंगून जाऊन जल्लोष साजरा करीत होते त्यामुळे कोण सत्ताधारी व कोण विरोधक हे समजून येते नव्हते. रमिजा लांडगे यांची सरपंचपदी निवड होताच त्यांच्यावर सर्वपक्षीय नेते कार्यकर्ते तसेच जिल्हाभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, पलूस कडेगांव विधानसभा मतदारसंघ संघाचे आमदार डॉ विश्वजीत कदम यांनी नागठाणे गावच्या सरपंचपदी निवड झालेल्या रमिजा झाकीरहुसेन लांडगे यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

Share

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!