माळवाडी -भिलवडीतून ड्रोन गेल्यामुळे नागरिकांत भीती ; पोलिस सतर्क, तपास सुरू

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील माळवाडी शिवाजीनगर हद्दीतून अवकाशातून कमी अंतरावरून भिलवडी मार्गाने रात्री साडे दहाच्या सुमारास ड्रोन गेला . ड्रोनचा आवाज असणारे व्हिडिओ अन् ड्रोनचे फोटोही नागरिकांनी पोलिसांना पाठविले आहेत. नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले असल्याने पोलिसांनी सतर्क होऊन तपास सुरू केला आहे.
शिवाजीनगर माळवाडी येथून भिलवडी मार्गाने कमी अंतरावरून अवकाशातून शनिवारी रात्री सुमारे 10:30 वाजता चकमक करीत ड्रोन जात असल्याचे पाहून नागरिकांनी व्हिडिओ आणि फोटो काढले. याबाबत सतर्कता बाळगून आणि आपली जबाबदारी समजून शिवाजीनगर येथील लोकांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना ड्रोनचा व्हिडिओ आणि फोटो पाठविण्यात आले . भिलवडी पोलिस कर्मचारी यांनीही ड्रोनची माहिती माळवाडी शिवाजीनगर येथील नागरिकांकडून घेतली आहे.
शिवाजीनगर माळवाडी येथून रात्री साडेदहाच्या सुमारास गेलेला ड्रोन भिलवडी हनुमान मंदिर जवळून गेल्याचे लोकांतून बोलले जात आहे. तर काही दिवसांपूर्वी शिवाजीनगर येथे अंधाऱ्या रात्रीतचा फायदा घेत असाच ड्रोन गेल्यानंतर चोरी झाल्याची घटना घडली होती, असे येथील नागरिकांतून बोलले जात आहे.
नक्कीच ड्रोन आहे की काय आहे ? हा तपास पोलिसांनी केल्यानंतर निष्पन्न होईल, पण नागरिकांत भीती निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी लवकरात लवकर तपास करावा, अशीही मागणी लोकांतून होत आहे.