13/04/2026

Connect with Us

Social menu is not set. You need to create menu and assign it to Social Menu on Menu Settings.

महाराष्ट्र

https://advaadvaith.com

      दर्पण न्यूज  सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 26.13 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची...
दर्पण न्यूज सांगली- : जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्तम कामगिरी करुन जास्तीत जास्त उत्पन्न घ्यावे व संपूर्ण महाराष्ट्रासमोर एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन  जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांनी केले.  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जुलै हा दिवस जिल्हा परिषद सांगली आणि जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेच्या वसंतरावदादा पाटील सभागृहात अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल यांच्या अध्यक्षतेखाली कृषि दिन म्हणून साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषि उपसंचालक धनाजी पाटील, कृषि संशोधन केंद्र कसबे डिग्रज येथील शास्त्रज्ञ डॉ.सुनिल महाजन, विभागीय कृषि सहसंचालक कार्यालयातील अधिक्षक कृषि अधिकारी अजय कुलकर्णी, प्रकल्प संचालक आत्मा अभयकुमार चव्हाण, मिरज तालुका कृषि अधिकारी मिलिंद निंबाळकर, जिल्हा परिषद कृषि विभागाचे मोहिम अधिकारी अमोल आमले आदि उपस्थित होते. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल म्हणाले, जिल्हा परिषद स्विय निधी मधून कृषि यांत्रिकीकरण अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण आणि अनुदानावरती ड्रोन पुरवठा करण्यात येणार असून त्याचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी...
Don`t copy text!