जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रतीचे वाटप

दर्पण न्यूज धाराशिव प्रतिनिधी (संतोष खुने):-
धाराशिव,
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत
जिल्हास्तर युवा महोत्सव 2025 – 26
धाराशिव येथे संपन्न झाला. यामध्ये जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धा , काव्य लेखन स्पर्धा व कहानी लेखन स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला . तसेच या प्रसंगी न्यू कनिष्ठ स्वतंत्र कला महाविद्यालय करजखेडा येथील महाविद्यालयातून निवड झालेल्या आठ विद्यार्थिनीनी वरील स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवून महाविद्यालयाचे प्रभावी प्रतिनिधित्व केले . तसेच नशामुक्त समृद्ध राष्ट्र बनवण्याचे चित्रातून विद्यार्थ्यांनी संदेश दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे वैयक्तिकरित्या कौतुक केले. त्यामुळे विशेष करून
विद्यार्थ्यांना मतदार जनजागरण समितीच्या संविधान जनजागृती उपक्रमातुन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना भारतीय संविधान उद्देशिका विश्लेषण प्रत वाटप करण्यात आल्या तर प्रा.बाळासाहेब अणदुरकर यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान सभेतील संसद मधील भाषण असलेले पुस्तक देण्यात आले, यावेळी मतदार जनजागरण समितीचे कार्याध्यक्ष गणेश रानबा वाघमारे , प्रा.परमेश्वर ढमाले, प्रा.बी.ई..ओव्हाळ उपस्थित होते.


