सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडी येथे आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
वाचनालयाचे ज्येष्ठ सभासद टकले गुरुजी यांचे हस्ते शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करणेत आले. यावेळी वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांनी शिवरायांचे कार्य म्हणजे आदर्श आहे संस्कार मूल्ये शिवरायांच्या प्रत्येक आचरणातून दिसून येतात ही मूल्ये आज सर्वांनी आचरणात आणली पाहिजेत केवळ एक दिवस उत्सव साजरा करून चालणार नाही तर आपले दैनंदिन जीवन शिवरायांच्या आदर्शावर चालले पाहिजे . असे सांगितले.
यावेळी विश्वस्त जी.जी पाटील संचालक डी आर कदम हणमंत डिसले तसेच सर्व वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल सौ. मयुरी नलवडे सौ. विद्या निकम सेवक माधव काटिकर यांनी केले. यावेळी बालवाचक मावळे मोठ्या संख्येने उपस्थित होते.