आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रसामाजिक
भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीस उद्योगपती गिरीश चितळे यांच्याकडून 50 हजारांची देणगी
वाचनालयाचे कार्यवाह सुभाष कवडे यांच्याकडे धनादेश सुपूर्द

दर्पण न्यूज भिलवडी/पलूस :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील सार्वजनिक वाचनालय भिलवडीचे अध्यक्ष उद्योगपती गिरीश चितळे यांचा आज 24 नोव्हेंबर 2025 रोजी वाढदिवस आहे. यानिमित्ताने उद्योगपती गिरीश चितळे यांचे प्रतिनिधी म्हणून प्रवीण पाटील यांनी वाचनालयात येऊन अध्यक्षांच्या वतीने 50 हजार रुपयांच्या देणगीचा धनादेश वाचनालयास प्रदान केला. कार्यवाह सुभाष कवडे यांनी धनादेश स्वीकारला. यावेळी जयंत केळकर, ग्रंथपाल मयुरी नलवडे, प्रमुख लेखनिक विद्या निकम, गजानन माने व वाचक उपस्थित होते.


