सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 17 च्या विकासासाठी कटिबद्ध : ज्यू रजनीकांत उर्फ बसवराज पाटील

दर्पण न्यूज मिरज/ सांगली (अभिजीत रांजणे) -:
सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 17 मध्ये मधील अनेक समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. वार्ड क्रमांक 17 मधील पायाभूत सुविधांची व्यवस्था करून येथील प्रलंबित विकासाची आवश्यकता आहे. प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांच्या विकासासाठी मी कटिबद्ध आहे, अशी माहिती टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्युनिअर रंजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
बसवराज पाटील यांनी सांगितले, की सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 17 मध्ये अनेक समस्यांना सामना नागरिकांना करावा लागत आहे. वार्ड मध्ये महिलांना पाणी समस्या, भटक्या कुत्र्यांचा त्रास, कचरा समस्या, घंटागाडी फिरकत नसल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. या प्रभागात चार चार महापौर होऊन गेले मात्र विकास कामे न झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. येथील महावीर उद्यानातील अनेक समस्यांना ज्येष्ठ नागरिकांना सामना करावा लागत आहे. भकास असे महावीर उद्यान झाले आहे. तेथे बसवण्यात आलेल्या काही साहित्य कित्येक वर्ष खराब स्थितीमध्ये आहे. देखभाल करण्याचे आवश्यकता आहे. ज्येष्ठ नागरिकांना आधार नाही, स्थानिक फंड खर्च होत नाही स्थानिक फंड कुठे खर्च होतो हा एक मोठा प्रश्न आहे. कोणतेही व्हिजन नसनारा वार्ड क्रमांक 17 म्हणावा लागेल. पावसाळ्यात डांबरीकरण केले जाते त्यामुळे हा रस्ता कसा टिकणार हा प्रश्नही स्थानिक लोकांना पडला आहे.वेळेत शववाहिनी मिळत नसल्याने लोकांची गैरसोय होत आहे. या अडचणी सोडवण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे. सांगली मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील वार्ड क्रमांक 17 च्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यकता आहे. प्रभाग 17 च्या विकासासाठी मी कटिबद्ध राहिलं,अशी माहिती टेलर वेल्फेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष ज्युनिअर रजनीकांत उर्फ बसवराज पाटील यांनी दिली.


