भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, भिलवडी यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात
भिलवडी गावातून पारंपरिक वेशभूषा परिधान करून विद्यार्पाथ्यांची मिरवणूक : मान्यवर ,पालकांचा सहभाग

दर्पण न्यूज भिलवडी :- सांगली जिल्हा पलूस तालुक्यातील भिलवडी येथील भिलवडी शिक्षण संस्थेच्या इंग्लिश मीडियम स्कूल, भिलवडी यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून “शिवउत्सव” कार्यक्रमाचे आयोजन ग्रामपंचायत भिलवडी येथे करण्यात आले. सर्व प्रथम ग्रामपंचायत येथे सरपंच सौ .सीमा शेटे मॅडम , ग्रामपंचायत सदस्या सौ. विद्या पाटील मॅडम, माजी सरपंच सौ. सविता महिंद – पाटील मॅडम व भिलवडी शिक्षण संस्थेचे विश्वस्त श्री. गिरीश चितळे सर, संस्थेच्या संचालिका सौ. लीना वहिनी चितळे, इंग्लिश मिडियम स्कूल, भिलवडी च्या मुख्याध्यापिका सौ.स्मिता माने यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले . या कार्यक्रमांमध्ये सिनिअर के.जी. वर्गातील विद्यार्थ्यांनी शिवगर्जना, शिवस्तुती, शिवप्रेरणा मंत्र, महाराजांच्या सभ्यतेची व प्रसंगावधानाची माहिती देणारे भाषण, महाराजांच्या शौर्याची पराक्रमाची गाथा सांगणारे पोवाडा , एक प्राचीन मर्दानी खेळ लाठी काठी, लेझीम नृत्य यांसारख्या विविध प्रकारांमुळे शिवप्रेमाने ओतप्रोत भरलेले सर्व वातावरण शिवमय झाले. राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांची घोड्यावरून गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये पारंपारिक वेशभूषा परिधान केलेले सर्व विद्यार्थी तसेच पालक सहभागी झाले. मिरवणूक ग्रामपंचायत, मेन रोड भिलवडी, बाहेरील गल्ली, मधली गल्ली , पठाण गल्ली,पाटील गल्ली अशी मिरवणूक काढण्यात आली. हनुमान मंदिरात मुलांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी सर्व ज्ञात अज्ञात पदाधिकारी, सर्व पोलीस स्टाफ, सर्व पत्रकार , फोटोग्राफर , सर्व ग्रामस्थ , सर्व शिक्षक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार सौ.मनिषा बाबर यांनी मानले.